धोनीचा पराक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला विकेट किपर
महेंद्रसिंह धोनी आयपीएलमध्ये विकेटमागे २०० बळी टिपणारा पहिला यष्टीरक्षक ठरलाय.
आयपीएलमधील २७६ सामन्यात धोनीनं विकेटमागे १५३ झेल आणि ४७ फलंदाजांना यष्टिचित केले आहे.
या यादीत दिनेश कार्तिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २५७ सामन्यात १३७ झेलसह ३७ स्टपिंग केल्याचा रेकॉर्ड आहे.
वृद्धिमान साहानं १७० आयपीएल सामन्यात ९३ झेलसह २६ फलंदाजांना यष्टिचित केले आहे.
रिषभ पंतने १२२ सामन्यात ७६ झेलसह २४ स्टम्पिंग केल्याचा रेकॉर्ड आहे.
या यादीत रॉबिन उथप्पा पाचव्या क्रमांकावर दिसतो. त्याने विकेटमागे ९० फलंदाजांना बाद करताना ५८ झेल आणि ३२ स्टंपिंग केले आहे.