IPL च्या एका हंगामात सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज

कोणत्या हंगामात कुणाच्या गोलंदाजीवर झाली षटकारांची 'बरसात' जाणून घ्या रेकॉर्ड

गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या राशीद खान याच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. 

आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार खाणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याने मोहम्मद सिराजची बरोबरी केलीये. 

मोहम्मद सिराजनं २०२२ च्या हंगामात आपल्या गोलंदाजीवर ३१ षटकार दिले होते. 

राशीद खानच्या गोलंदाजीवर २०२५ च्या हंगामात साखळी फेरीपर्यंतच्या लढतीत प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांनी ३१ षटकार मारले आहेत.

२०२२ च्या हंगामात वानिंदू हसरंगा याने ३० षटकार दिले होते. 

गत हंगामात युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर ३० षटकारांची बरसात झाली होती. 

२०१८ च्या हंगामात ड्वेन ब्रावोनं २९ षटकार दिल्याचे पाहायला मिळाले होते. 

Click Here