त्याचा हा विक्रम मोडणं मुश्किलच, जाणून घ्या सविस्तर
आयपीएलच्या १८ व्या हंगामात १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीन हवा केलीये.
यंदाच्या हंगामात ३५ चेंडूतील शतकी खेळीसह तो टी-२० क्रिकेटमधील सर्वात युवा शतकवीर ठरला.
पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात ४० धावांच्या खेळीसह त्याने आणखी एक महारेकॉर्ड सेट केला आहे.
४ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने त्याने १५ चेंडूत ४० धावांची खेळी करताना एकही धाव पळून काढली नाही.
टी-२० क्रिकेटमध्ये फक्त बाउंड्रीच्या रुपात सर्वाधिक धावा करणारा तो सर्वात युवा क्रिकेटर ठरला आहे.
पंजाब विरुद्धच्या सामन्यात त्याने २६६ च्या स्ट्राइक रेटनं धावा कुटल्याचे पाहायला मिळाले.
वैभव सूर्यंवशी याने यंदाच्या हंगामात ६ सामन्यात एका शतकाच्या मदतीने २१९.१० च्या स्ट्राइक रेटसह १९५ धावा केल्या आहेत.