कॅप्टन्सी मिळताच शुबमन गिल दिग्गजांच्या पंक्तीत
रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर शुबमन गिलच्या रुपात कसोटीत टीम इंडियाला नवा कर्णधार मिळाला आहे.
कॅप्टन्सीची माळ गळ्यात पडताच शुबमन गिलच्या नावे खास विक्रमाची नोंद झालीये.
भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा तो पाचवा सर्वात युवा कर्णधार ठरलाय. २५ वर्षे आणि २५८ वय असताना त्या ही जबाबदारी मिळालीये.
मन्सूर अली खान पतौडी हे भारतीय कसोटी संघाचे सर्वात युवा कर्णधार आहेत. २१ व्या वर्षी त्यांनी कसोटीत संघाचे नेतृत्व केले होते.
सचिन तेंडुलकरने २३ व्या वर्षी कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व केल्याचा रेकॉर्ड आहे.
कपिल देव यांना वयाच्या २४ व्या वर्षी भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती.
रवी शास्त्री हे देखील वयाच्या २५ व्या वर्षी भारतीय कसोटी संघाचे कर्णधार झाले होते.