पॉवरप्लेमध्ये आयुष म्हात्रेची पॉवर

CSK कडून पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पॉवर प्लेमध्ये CSK कडून सर्वाधिक षटकार मारण्यात आयुष म्हात्रे आघाडीवर राहिल्याचे दिसते.

चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात लेट एन्ट्री झालेल्या आयुष म्हात्रेनं ७५ चेंडूचा सामना करताना पॉवर प्लेमध्ये ४ षटकार मारले आहेत. 

CSK च्या ताफ्यातील उर्विल पटेल याने पॉवरप्लेमध्ये १३ चेंडूचा सामना करताना ४ षटकार मारलेत.

शेख रशीद याने CSK च्या डावाची सुरुवात करताना पॉवरप्लेमध्ये ६० चेंडूचा सामना करताना २ षटकार मारले आहेत. 

 ऋतुराज गायकवाडनं ४४ चेंडूंचा सामना करताना पॉवरप्लेमध्ये २ षटकार मारल्याचे पाहायला मिळाले आहे.

राहुल त्रिपाठीनं ३३ चेंडूचा सामना करताना पॉवरप्लेमध्ये फक्त एकच षटकार मारला.

आर अश्विनलाही पॉवरप्लेमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याने १३ चेंडूत १ षटकार मारल्याचे दिसून आले.

Click Here