रोहित शर्माला खुणावतोय मोठा विक्रम
हिटमॅन रोहित शर्माला आयपीएलमध्ये षटकारांचे त्रिशतक साजरे करण्याची संधी आहे.
रोहित शर्माच्या भात्यातून तीन षटकार आले तर तो ३०० षटकार मारणारा पहिला भारतीय ठरेल. इथं एक नजर IPL मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांवर
IPL मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा ख्रिस गेलच्या नावे आहे. वेगवेगळ्या फ्रँयाचझीकडून खेळताना त्याने ३५७ षटकार मारले आहेत.
राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.
MI स्टार हिटमॅन रोहित शर्मा २९७ षटकारांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. ३ षटकारासह ३०० षटकार मारणारा तो दुसरा फलंदाज ठरु शकतो.
IPL च्या पहिल्या हंगामापासून RCB च्या ताफ्यातून खेळणाऱ्या विराट कोहलीच्या खात्यात २९१ षटकार मारल्याचा विक्रम आहे.
चेन्नई सुपर किंग्जसह पुण्याच्या संघाकडून खेळलेल्या महेंद्रसिह धोनीनं आपल्या आयपीएल कारकिर्दीत २६४ षटकार मारले आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा एबी डिविलियर्स २५१ षटकारांसह या यादीत टॉप ५ मध्ये असल्याचे दिसून येते.
ऑस्ट्रेलियन स्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर याने सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना आयपीएलमध्ये २३६ षटकार मारले आहेत.