IPL 2025 मध्ये धुमाकूळ घालणारा रियान पराग हा कोट्यधीश आहे
IPL 2025 मध्ये धुमाकूळ घालणारा रियान पराग हा कोट्यधीश आहे. त्याच्या ब्रँड व्हॅल्यूत मोठी वाढ झालीये.
रियान पराग हा २३ वर्षांचा आहे आणि अनेक ब्रँड्सना एंडोर्स करतो.
त्याच्या या वाढत्या पोर्टफोलिओमध्ये रेड बूल, प्युमा, स्टार सीमेंट, रॉयल ग्लोबल युनिव्हर्सिटी आणि सरीन स्पोर्ट्ससारखे ब्रँड्स आहेत.
गेल्या वर्षी त्यानं ड्रिम ११ सोबतही ब्रँड एंडोर्समेंट डील केली होती.
या सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सनं रियान परागला १४ कोटी रुपयांमध्ये रिटेन केलंय.
त्याची बहुतांश कमाई राजस्थान रॉयल्स सोबत आयपीएल काँट्रॅक्ट, घरगुती क्रिकेट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून होते.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याची नेटवर्थ १५ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.