सोशल मीडियावर पीव्ही सिंधूची पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. जाणून घ्या सविस्तर
भारताची ऑलिम्पियन क्वीन पीव्ही सिंधू बॅडमिंटनच्या मैदानातील आपल्या कामगिरीसह फिल्डबाहेरील गोष्टींमुळेही चर्चेत असते.
आता तिची एक नवी पोस्ट चर्चेत आहे. ज्यात ती स्टेडियमवर जाऊन आयपीएल सामन्याचा आनंद घेताना दिसून येते.
पीव्ही सिंधूनं RCB विरुद्ध RR यांच्यातील सामन्यात पाहण्यासाठी बंगळुरुच्या स्टेडियमवर हजेरी लावली होती.
डोक्यात अजूनही ऑरेंज आर्मी असली तरी आता नवी सिटी अन् नवी टीम मनात भरलीये, असे म्हणत ती RCB ला सपोर्ट करताना दिसली. ली आहे.
भारतीय बॅडमिंटन स्टार लग्नानंतर बिझनेसमन पती व्यंकट दत्ता साईसोबत बंगळुरुला सेटल झालीये. त्यामुळेच तिने आपली IPL टीम बदलल्याचे दिसते.
पीव्ही सिंधू ही मूळची हैदरबादची. याआधी आयपीएलमध्ये ती सनरायझर्स हैदरबादला सपोर्ट करतान दिसायची.
लग्नानंतर आपल्याकडे मुलीच नाव बदलते. पण सिंधूनं IPL टीम बदललीये, असे काहीचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.