फक्त या ६ भारतीय फलंदाजांनी साधलाय हा डाव
दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या लोकेश राहुलनं सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात टी-२० क्रिकेटमध्ये एका खास विक्रमाला गवसणी घातली.
१० सामन्यात ३८१ धावा करणाऱ्या लोकेश राहुलनं SRH विरुद्धच्या लढतीत टी -२० क्रिकेटमध्ये १००० बाउंड्री (षटकार अन् चौकार) मारण्याचा टप्पा पार केला.
टी २० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरला. इथं एक नजर अशी कामगिरी करणाऱ्या भारतीय फलंदाजांवर
विराट कोहलीनं आपल्या आतापर्यंतच्या टी-२० कारकिर्दीत १६०२ बाउंड्री मारल्याचा रेकॉर्ड आहे.
हिटमॅन रोहित शर्मा या यादीत १५८८ बाउंड्रीसह दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून येते.
शिखर धवन याने आपल्या टी-२० कारकिर्दीत १३२४ बाउंड्री मारल्याचा रेकॉर्ड आहे.
सूर्यकुमार यादव याने आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये १२०४ बाउंड्री मारल्या आहेत.
सुरेश रैनाचाही या यादीत समावेश आहे. त्याच्या खात्यात टी-२० क्रिकेटमध्ये ११०४ बाउंड्री जमा आहेत.