बॉलिवूड अभिनेत्री अन् केकेआरची सह मालकीण जुहीनं लुटली मैफिल
कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात केकेआरची सह संघ मालकीण जुही चावला मेहता आपल्या संघाला चीअर करताना दिसली.
KKR ची सह मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाची स्टेडियममधील झलक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
तिची झलक दिसताच ईडन गार्डन्सवर DJ वाल्या बाबूनं "जादू तेरी नजर" हे गाणं वाजवल्याचेही पाहायला मिळाले.
KKR च्या फलंदाजीवेळी जुही चावला फलंदाजांच्या फटकेबाजीला दाद देताना उभे राहून टाळ्या वाजवत दाद देताना पाहायला मिळाले.
डोईवर केकेआरची कॅप अन् पांढऱ्या रंगातील शर्टसह तिचा लूकही एकदम कडक अन् लक्षवेधी असाच होता.
ईडन गार्डन्सच्या स्टेडियम स्टँडमधील अभिनेत्रीचा स्टायलिय अंदाज चाहत्यांना चांगलाच भावल्याचेही पाहायला मिळते.
राजस्थान विरुद्धच्या सामन्यात ती KKR साठी लकी चार्म ठरेल, अशा कमेंट्सही तिच्या व्हायरल फोटोंवर उमटताना दिसत आहे.