सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात एक विकेट घेतली अन् बुमराहच्या नावे झाला खास रेकॉर्ड
सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहाने टी-२० क्रिकेटमध्ये ३०० विकेट्सचा टप्पा पार केला.
हेनरिच क्लासेन याची विकेट्स घेताच जसप्रीत बुमराह टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात ३०० विकेट्स घेणारा भारतीय जलदगती गोलंदाज ठरलाय.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात ३०० विकेट्स घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अँड्रु टायच्या नावे आहे. त्याने २०८ डावात ही कामगिरी केलीये.
या यादीत श्रीलंकन दिग्गज लसिथ मलिंगा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २१७ डावात ३०० विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.
बुमराह २३७ डावात ही पल्ला गाठत कमी डावात ३०० विकेट्स घेणाऱ्या जलगती गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
जसप्रीत बुमराह हा टी-२० क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स घेणारा भुनवेश्वर कुमार (३१८ विकेट्स) याच्या नंतर दुसरा भारतीय जलदगती गोलंदाज आहे.
याशिवाय चहल (३७३), पियूष चावला (३१९), आर अश्विन (३१५) या भारतीय फिरकीपटूंनी फिरकीपटूंनी टी-२० त ३०० पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
मलिंगाने मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये १७१ विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहन त्याच्या विक्रमाशीही बरोबरी केलीये.