चहलची हॅटट्रिक अन् चर्चेत आली RJ माहवश; कारण...

CSK विरुद्धच्या सामन्यात चहलनं साधला हॅटट्रिकचा डाव, अन्...

युजवेंद्र चहल याने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात IPL कारकिर्दीतील दुसरी हॅटट्रिक नोंदवली.

चहलच्या हॅटट्रिकनंतर त्याची कथित गर्लफ्रेंड RJ माहवश खास पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

चहलच्या हॅटट्रिकनंतर RJ माहवश हिने गॉड मोड ऑन... अशा कॅप्शनसह  फिरकीपटूला योद्धा असे संबोधले आहे. तिच्या या पोस्टमुळे ती चर्चेत आल्याचे दिसते.

याआधी  RJ माहवश स्टेडियममध्ये उपस्थितीत राहून पंजाब किंग्जसह चहलला चीअर करतानाही पाहायला मिळाले आहे.

धनश्री वर्मापासून विभक्त झाल्यापासून अनेकदा चहल आणि RJ माहवश एकत्र स्पॉट झाले आहेत. 

ही जोडी जमल्याची चर्चा रंगत असताना  RJ माहवशच्या पोस्टमधून प्रेम फुलत असल्याची हिंट देताना पाहायला मिळते. 

त्यात आता तिच्या नव्या पोस्टची भर पडली आहे. पुन्हा एकदा तिने चहलवर प्रेम व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.

Click Here