भुवीनं केली बुमराहच्या रेकॉर्डशी बरोबरी
RCB च्या ताफ्यातून खेळणाऱ्या भुवनेश्वर कुमारनं आयपीएलमध्ये क्लीन बोल्डच्या रुपात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या जसप्रीत बुमराहच्या विक्रमाचीही बरोबरी केलीये.
इथं एक नजर टाकुयात आयपीएलमध्ये 'क्लीन बोल्ड'च्या स्वरुपात सर्वाधिक विकेट्स आपल्या खात्यात जमा करणाऱ्या गोलंदाजांवर...
या यादीत लिसिथ मलिंगा सर्वात आघाडीवर आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ६३ फलंदाजांना क्लीन बोल्ड केले आहे.
केकेआरच्या ताफ्यातून खेळणाऱ्या सुनील नरेननं आतापर्यंत ५२ फलंदाजांना क्लीन बोल्ड केल्याचा रेकॉर्ड आहे.
माजी फिरकीपटू पियुष चावला याने आयपीएल कारकिर्दीत ५० बॅटर्संना क्लीन बोल्ड केले आहे.
जसप्रीत बुमराहनं आतापर्यंतच्या आपल्या आयपीएल कारकिर्दीत ४१ फलंदाजांना त्रिफळाचित केल्याचे पाहायला मिळाले आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज असलेल्या भुवीनं ४१ फलंदाजांना क्लीन बोल्ड केले आहे.
या यादीत रवींद्र जडेजा ४० फलंदाजांना क्लीन बोल्ड करून सहाव्या क्रमांकावर असल्याचे दिसून येते.