नवीन गुंतवणूकदारांसाठी १० टीप्स

नवीन गुंतवणूकदारांसाठी हे मूलभूत नियम महत्त्वाचे आहेत. हळू हळू आणि समजून घेऊन गुंतवणूक केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.

गुंतवणूक कशासाठी करत आहात? निवृत्ती, घर खरेदी, मुलांचे शिक्षण किंवा इतर कोणतेही दीर्घकालीन किंवा अल्पकालीन उद्दिष्ट्य निश्चित करा.

तुम्ही किती प्रमाणात जोखीम घेऊ शकता? त्याप्रमाणेच गुंतवणुकीचा पर्याय निवडा.

शेअर बाजार, म्युच्युअल फंड, बाँड्स आणि इतर गुंतवणूक पर्यायांची माहिती घ्या. आर्थिक पुस्तके वाचा, वेबसाईट्स आणि तज्ञांचे मार्गदर्शन घ्या.

गुंतवणुकीसाठी वेळेचं महत्त्व खूप आहे. लवकर सुरुवात केल्यास चक्रवाढीचा फायदा मिळतो आणि कमी गुंतवणुकीत मोठे उद्दिष्ट्य साधता येते.

एसआयपीच्या माध्यमातून नियमितपणे छोटी रक्कम गुंतवणे हा चांगला पर्याय आहे. यामुळे बाजारातील अस्थिरतेचा प्रभाव कमी होतो.

आपली सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी किंवा एकाच प्रकारच्या मालमत्तेत गुंतवू नका.

गुंतवणूक ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. बाजारातील अल्पकालीन चढ-उतारांनी विचलित होऊ नका आणि आपल्या दीर्घकालीन योजनेवर विश्वास ठेवा.

गुंतवणुकीसाठी जास्त पैसे वाचवण्यासाठी अनावश्यक खर्च टाळा आणि एक बजेट तयार करा.

बाजारातील तेजी किंवा मंदी पाहून घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. शांतपणे विचार करून आपल्या योजनेनुसार वाटचाल करा.

आपल्या गुंतवणुकीचा नियमितपणे आढावा घ्या. आपली आर्थिक उद्दिष्ट्ये किंवा बाजारातील बदलानुसार पोर्टफोलिओमध्ये आवश्यक बदल करा.

Click Here