रात्री लवकर कामंं संपली, लवकर झाेपायला मिळालं की सगळ्यांना आनंद हाेताे. पण, त्यावेळी तुम्हाला झाेप लागते का?
डेडलाईन प्रेशर मग घरातलं काम असाे किंवा ऑफिसचं काम असाे ती पाळावी लागते. मग त्याचा ताण हा येताेच.
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक समस्या वाढत आहेत. त्यातलीच एक म्हणजे निद्रानाश म्हणजे इन्साेमेनिआ.
रात्री झोप न येणे, वारंवार जाग येणे किंवा सकाळी लवकर उठून पुन्हा झोप न लागणे असं तुमच्या बाबतीत वारंवार हाेतयं का?
बदलत्या जीवनशैलीमध्ये झाेपेच्या चुकीच्या वेळा, माेबाईलचा जास्त वापर हे आता काॅमन झाले आहे.
कॅफिनयुक्त पदार्थांच्या सेवनाचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत वाढले आहे. याचा परिणाम थेट तुमच्या झाेपेवर हाेतं आहे.
दिवसभर थकवा जाणवणे, सतत चिडचिड हाेणे. काॅन्सट्रेशन कमी हाेणे, याचा अनुभव अनेकजण घेत असतात.
प्रत्येक माणसाला राेजच्या राेज किमान ७ तासांची झाेप आवश्यक असते. शांत झाेप लागणे, हे निराेगीपणाचे लक्षण आहे.
रात्री झाेप लागायला वेळ लागणे, रात्री मधेच जाग येणं असं वारंवार हाेत असेल तर ही धाेक्याची घंटा आहे.
झाेपेची समस्या ही ३ आठवड्यांपेक्षा अधिक काळ असेल. औषधांशिवाय झाेप लागत नसेल, तर तुम्हाला डाॅक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे.
झाेपेचा त्रास वाढण्याआधी वेळेवर झाेपणे, झाेपण्याआधी स्क्रीन टाईम टाळणे हे साधे बदल करून फरक पाहू शकता.
रात्री झाेपताना संगीत ऐकणे, काेमट दुध पिणे, खाेलीत अंधार करणे असे घरगुती उपाय झाेपेवर तुम्ही करू शकता.