तिरंग्याविषयी तुम्हाला माहिती आहे का?

भारतीय तिरंगा म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचं आणि एकतेचं प्रतिक आहे. तिरंग्याची रचना, रंग आणि आकार यामागे सखाेल इतिहास आहे. 

काेलकत्यामध्ये १९०६ मध्ये पहिला राष्ट्रीय ध्वज फडकवला गेला. त्या ध्वजामध्ये हिरवा, लाल आणि पिवळा रंग हाेता. 

१९२१ मध्ये पिंगळी वेंकय्या यांनी महात्मा गांधीसमाेर केशरी आणि हिरव्या रंगाचा ध्वज दाखवला हाेता. गांधीजींनी त्यात पांढरा रंग, अशाेकचक्राचा सल्ला दिला.

२२ जुलै १९४७ राेजी भारतीय संविधान सभेने आजचा तिरंगा स्वीकारला. ताे स्वातंत्र्यनंतरचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज ठरला. 

तिरंग्यातील केशरी रंग हा शाैर्य, त्याग आणि निस्वार्थी सेवेचे प्रतिक आहे. हा तिरंग्यातील पहिला रंग आहे. 

तिरंग्यामध्ये पांढरा रंग असताे. हा पांढरा रंग सत्य, शांती आणि प्रामाणिकपणाचे प्रतिक आहे.

हिरवा रंग हा सर्वात खाली असताे. हिरवा रंग समृद्धी, शेती आणि निसर्गाचे प्रतिक आहे. 

पांढऱ्या पट्ट्यात मधे गडद निळ्या रंगाचे अशाेक चक्र असते. त्यामध्ये २४ अरे असतात. अशाेक चक्र न्याय, प्रगती, जीवनाच्या सततच्या गतीच प्रतिक आहे. 

Click Here