साखरपुड्यानंतर दोघांनी पहिल्यांदाच शेअर केली रिलेशनसंदर्भातील गोष्ट
स्टार क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज या जोडीनं नुकताच साखरपुडा उरकला.
साखरपुड्यातील खास क्षण सोशल मीडियावर शेअर करताना या जोडीनं रिलेशनशिपसंर्भातील खास गोष्ट शेअर केली आहे.
या दिवसाची आम्ही ३ वर्षांपासून वाट बघत होतो, या कॅप्शनसह खास फोटो शेअर करत जोडीनं रिलेशनशिपची अनटोल्ड स्टोरी सांगितलीये.
जवळच्या मित्राच्या ओळखीतील एका व्यक्तीमुळं रिंकू सिंह आणि प्रिया सरोज ही जोडी पहिल्यांदा एकमेकांना भेटली होती.
जवळपास अडीच वर्षे एकमेकांना समजून घेतल्यावर दोन्ही कुटुंबियांच्या मान मर्यादा राखून नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.
प्रिया सरोज हा युवा खासदाराच्या रुपात लोकप्रिय चेहरा आहे. प्रसिद्धीच्या झोकात असूनही रिंकूसोबतच्या नात्याची भनकही कुणाला नव्हती.
रिंकूनही तेच भान जपलं. आयपीएलमधून स्टारडम मिळाल्यावरही प्रेमाची फ्रेम दिसली ते थेट साखरपुड्यातच.