भारतीय कमांडो 'मार्कोस' चे जबरदस्त मिशन

भारतीय नौदलाकडे मरीन कमांडो मार्कोस नावाचे एक एलिट फोर्स आहे. 

भारतीय नौदलाकडे मरीन कमांडो मार्कोस नावाचे एक एलिट फोर्स आहे. क्रोकोडाइल फोर्स म्हणूनही ओळखले जाणारे हे फोर्स भारत आणि इतर अनेक देशांमध्ये यशस्वीरित्या मोहिमा पार पाडत आहेत.

त्यांचे टोपणनाव क्रोकोडाइल असे आहे कारण ते मगरीसारखे पाण्याखाली मोहिमा पार पाडण्यास सक्षम आहेत.

१९८७ मध्ये मार्कोसने पाण्याखाली तरंगत श्रीलंकेतील एलटीटीईच्या ताब्यातील जाफना आणि त्रिंकोमाली बंदरे उद्ध्वस्त केली.

मार्कोसने १९८८ मध्ये मालदीवचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मौमून अब्दुल गयूम यांना वाचवून मालदीवमध्ये एक सत्तापालट रोखला.

१९९८ मध्ये, अंदमान लँडफॉल बेटांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबवण्यासाठी मार्कोसने सहा बंडखोरांना ठार मारले आणि ७३ लोकांना अटक केली.

२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात, मार्कोस कमांडोंनी दहशतवाद्यांबोरबर दोन हात केले. एनएसजी येईपर्यंत, प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह शेकडो लोकांना वाचवण्यात आले.

दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांची मुलगी राजकुमारी शेख लतीफा, बोटीने पळून गेली आणि भारतात राजकीय आश्रय मागत होती. पण मार्कोसने तिला पकडले आणि तिच्या देशात परत पाठवले.

Click Here