क्रिकेटरच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट
क्रिकेटर्स अन् बॉलिवूड अभिनेत्री यांच्यातील वर्षानुवर्षे एक खास कनेक्शन पाहायला मिळाले आहे.
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानी या जोडीतील प्रेम प्रकरणही चांगलेच गाजले.
अभिनेत्रीसोबत लग्न करण्यासाठी या दिग्गज क्रिकेटरनं पहिली पत्नी नौरीन हिला 'तलाक' दिला होता.
पोटगीच्या स्वरुपात त्यावेळी क्रिकेटरनं पत्नीला जवळपास १ कोटी रुपये दिले होते. नव्वदीच्या दशकातील देशातील हा सर्वात महागडा घटस्फोट ठरला होता.
जाहिरातीच्या निमित्ताने पहिली भेट झाल्यावर क्रिकेटर या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला.
१९९६ मध्ये लग्नबंधनात अडकल्यानंतर १४ वर्षांनी म्हणजे २०१० मध्ये दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय़ घेतला.
लोकप्रिय बॅटमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिच्यासोबत नाव जोडले गेल्यामुळे क्रिकेटर अन् बॉलिवूड अभिनेत्री वेगळे झाले असेही बोलले जाते.