ना फ्लर्टिंग; ना डेटिंग! लग्नाआधी 'शुद्ध सज्जन शंभर नंबरी' क्रिकेटर

९० मिनिटांच्या कॉलवर जमली होती ही जोडी

भारतीय क्रिकेटर्सची मैदानातील कामगिरीशिवाय मैदानातील प्रेमाच्या लपंडावामुळे चर्चेत असतात. 

 पण या क्रिकेटरनं  लग्नाआधी प्रेमाचा खेळ खेळण्यापेक्षा फक्त अन् फक्त क्रिकेटवर फोकस करण्यावर भर दिला. 

तो क्रिकेटर दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्तीची घोषणा करणारा चेतेश्वर पुजारा.


लग्न करायचं हे ठरवल्यावर तो पुजासोबत ९० मिनिटे कॉलवर बोलला. दीड तासांच्या या चर्चेत ही जोडी जमली.

पहिल्या भेटीतच पुजाराचा स्वभाव मनाला भावल्याची गोष्ट पूजानं एका मुलाखतीत शेअर केली होती. 

क्रिकेटर पुजारापेक्षात त्याची पत्नी वयाने ६ वर्षांनी छोटी आहे. रिटेल मॅनेजमेंटमध्ये MBA केल्यावर तिने HR हेडच्या रुपातही काम केलं आहे. 

पूजानं 'द डायरी ऑफ क्रिकेटर वाईफ' शीर्षकाखाली एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाच्या लॉचिंग वेळी पुजारानं बायकोवरील खास प्रेम व्यक्त केलं होतं.

पूजा माझ्या आयुष्यातील पहिलं अन् शेवटचं प्रेम आहे, असं तो म्हणाला होता.

१३ फेब्रुवारी २०१३ मध्ये पुजारा आणि पूजा यांनी राजकोट येथे विवाहबंधनात अडकले. या स्वीट कपलला एक मुलगी आहे. जिचे नाव आदिती असं आहे.

Click Here