भारतीय हवाई दल, नौदलही वचक ठेवते...
इराणने अमेरिकेच्या कतारमधील लष्करी तळावर हल्ला केला होता.
यामुळे फक्त अमेरिका, चीन या देशांचेच तळ परदेशात असतात का असा प्रश्न अनेकांना सतावत होता.
तर नाही, आपल्या भारत देशाचेही परदेशांत लष्करी तळ उभारलेले आहेत.
भारताने आपल्या वाढत्या धोरणात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी हे लष्करी तळ उभारलेले आहेत.
अमेरिकेसारखे भारताचे इतर देशांमध्ये मोठमोठे कायमस्वरुपी लष्करी तळ नाहीत.
परंतू, काही देशांमध्ये नौदलाला रसद सुविधा, पाळत ठेवण्यासाठी आणि धोरणात्मक दृष्ट्या मदत करण्यासाठी लष्करी तळ आहेत.
यापैकीच एक देश आहे मॉरिशस. अगालेगा बेटांवर भारती हवाईदल आणि नौदल येथे तळ उभारत आहे. हिंद महासागरात भारताची पोहोच वाढणार आहे.
ओमानच्या दुकम बंदर आणि रस अल हद्द येथे भारताचे लष्करी तळ आहेत. नौदलाचा दुकम बंदराजवळ तर हद्द येथे इलेक्ट्रॉनिक देखरेख ठेवण्यासाठी सैन्याचा तळ आहे.
ताजिकिस्तानमधील फारखोर हवाई तळावर भारताचा लष्करी तळ आहे. जिथून भारतीय सैन्य अफगाणिस्तानसह संपूर्ण मध्य पूर्वेवर लक्ष ठेवते.
एवढेच नाही तर मादागास्कर, कोमोरोस, मोझांबिक, टांझानिया येथे किनाऱ्यांवर पाळत ठेवण्याची स्टेशन्स आहेत.