जगभरात 39.10 अरब डॉलर इतक्या किमतीच्या तांदळाची निर्यात केली जाते.
जगभरात जवळपास सगळ्याच देशांमध्ये तांदळाचं सेवन केलं जातं. त्यामुळे अनेक देश तांदळाची आयात-निर्यात करतात.
अलिकडेच ग्लोबल राइस एक्सपोर्ट 2024-2025 ने एक रिपोर्ट तयार केला. या रिपोर्टनुसार, जगभरात 39.10 अरब डॉलर इतक्या किमतीच्या तांदळाची निर्यात केली जाते.
रिपोर्टनुसार, भारत हा सर्वात जास्त तांदूळ निर्यात करणार देश ठरला आहे. जवळपास 11. 83 अरब डॉलर किमतीची निर्यात भारताकडून केली जाते. जगभरात निर्यात होणाऱ्या तांदळांमध्ये भारताचा 30.3 टक्के वाटा आहे.
भारतानंतर सर्वात जास्त निर्यात करणाऱ्या देशांमध्ये थायलँड, व्हिएतनाम याचा क्रमांक लागतो. परंतु, या सगळ्यात स्वस्त तांदूळ कोणता देश विकतो माहितीये का?
भारतानंतर थायलँडने 6.37 अरब डॉलर इतक्या किमतीच्या तांदळाची निर्यात केली आहे. तर, त्याच्या खालोखाल व्हिएतनामने 5.70 अरब डॉलर किमतीच्या तांदळाची निर्यात केली.
व्हिएतनाम हा सर्वात स्वस्त तांदळाची निर्यात करणारा देश ठरला आहे. थायलँड आणि व्हिएतनाम या दोघांची एकत्रित निर्यात पाहिली तर जगभरात निर्यात होणाऱ्या तांदळांमध्ये त्यांचा वाटा फक्त 14.4 टक्के इतका आहे.
तांदळाची निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारत अग्रस्थानी असला तरीदेखील तांदळाचं सर्वात जास्त उत्पादन चीनमध्ये केलं जातं. मात्र, असं असूनही चीन तांदळाची निर्यात फार कमी करतो.