स्वातंत्र्यदिनी आपल्यापैकी बहुतांश लोक हे पांढरे कपडे घालणं पसंत करतात.
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं. यावर्षी आपण ७९वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत.
दरवर्षी संपूर्ण देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. यावेळी आपल्यापैकी बहुतांश लोक हे पांढरे कपडे घालणं पसंत करतात.
पण, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पांढरे कपडे का घालतात? याचं कारण तुम्हाला माहितीये का?
आपल्या तिरंग्यात पांढरा रंग मध्यभागी आहे. हा रंग म्हणजे शांततेचं प्रतिक.
याशिवाय महात्मा गांधीने सांगितलेल्या अहिंसा आणि खरेपणा ही नीतीमूल्येही पांढरा रंग दर्शवतो.
शांतता, स्वातंत्र्य, अहिंसा आणि खरेपणा यांचं प्रतिक म्हणून स्वातंत्र्यदिनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात.
पांढऱ्या रंगासोबत तिरंग्यात असणाऱ्या केशरी आणि हिरवा रंगाचे कॉम्बिनेशनही केले जाते.