पाकिस्तान भारताच्या एक दिवस आधी का साजरा करतो स्वातंत्र्यदिन?

कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल!

१५ ऑगस्ट हा दिवस भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण याच दिवशी भारताला ब्रिटीशाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. 

खरं तर १९४७ साली ब्रिटिश साम्राज्यातून भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांचा उदय झाला. फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन देश बनले.

ऐतिहासिकदृष्ट्या, स्वातंत्र्याचा दिवस १५ ऑगस्ट १९४७ होता. पण पाकिस्तानने आपला अधिकृत स्वातंत्र्य दिन एक दिवस आधी म्हणजे १४ ऑगस्टला साजरा करण्याचा निर्णय घेतला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात वेगवेगळ्या दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यामागे अनेक तर्कवितर्क दिले गेले आहेत. 

यात असाही तर्क आहे की, पाकिस्तानच्या नेत्यांना भारतासोबत एकाच दिवशी स्वातंत्र्य दिवस साजरा करणे मान्य नव्हते.

असेही मानेल जाते की, पाकिस्तानची वेळ भारतापेक्षा ३० मिनिटे मागे आहे. भारतात जेव्हा रात्रीचे १२ वाजलेले असतात, तेव्हा पाकिस्तानातील घड्याळात ११.३० वाजलेले असतात. 

त्यामुळे जेव्हा ब्रिटिश सरकारने भारतीय स्वातंत्र्य कायद्यावर स्वाक्षरी केली, तेव्हा रात्रीचे १२ वाजले होते. म्हणजे भारतात १५ ऑगस्ट आणि पाकिस्तानमध्ये १४ ऑगस्टला रात्री 1११:३० वाजले होते.

एक युक्तिवाद असाही दिला जातो की तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन हे ब्रिटीश सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.

त्यामुळे ते एकाच वेळी दिल्ली आणि कराचीला जाऊ शकले नसते. त्यामुळे त्यांनी १४ ऑगस्टला पाकिस्तानकडे आणि १५ ऑगस्टला भारताकडे सत्ता हस्तांतरित केली. 

यामुळेच पाकिस्तान आपला "स्वातंत्र्य दिन"भारताच्या एक दिवस आधी साजरा करतो. तसेच इस्लामिक कॅलेंडरनुसार तो दिवस रमजानच्या २७व्या दिवशी आल्यामुळे त्याला अधिक धार्मिक महत्त्वही जोडले गेले.

Click Here