भारतीय युवा बॅटर अगदी सहज पाकच्या माजी स्फोटक फलंदाजाच्या विक्रमाला लावू शकतो सुरुंग
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याला मोठा विक्रम नोंदवण्याची संधी आहे.
यशस्वी जैस्वाल पहिल्यांदाच इंग्लंडच्या मैदानात कसोटी खेळताना दिसणार आहे.
पहिल्या दोन-तीन कसोटीत तो पाकच्या शाहिद आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडून इंग्लंड दौरा अविस्मरणीय करण्याची संधी यशस्वी जैस्वालकडे आहे.
कसोटीत सर्वात जलद षटाकारांचे अर्धशतक साजरे करण्याचा विक्रम हा शाहिद आफ्रिदीच्या नावे आहे.
पाकच्या माजी स्फोटक फलंदाजाने २६ सामन्यात कसोटीत ५० षटकार मारत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
यशस्वी जैस्वाल याने आतापर्यंत १९ सामन्यात ३९ षटकार मारले आहेत.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत ११ षटकारांसह तो आफ्रिदीला मागे टाकत वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करु शकतो.