टीम इंडियाचा उप कर्णधार रिषभ पंत याने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावातील शतकासह अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.
पहिल्या डावात १३४ आणि दुसऱ्या डावातील ११८ धावांसह इंग्लंडच्या मैदानात कसोटीत सर्वाधिक २५२ धावा करणारा तो विकेट किपर बॅटर ठरला आहे.
इंग्लंडच्या मैदानात एका कसोटीत दोन्ही डावात शतक झळकवणारा तो आशियातील पहिला विकेट किपर बॅटर ठरला आहे.
अँडी फ्लॉवर याच्यानंतर एका कसोटीतील दोन्ही डावात शतक झळकवणारा तो दुसरा विकेट किपर बॅटर ठरलाय.
८ व्या शतकासह कसोटीत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या आशियाई विकेट किपर बॅटरच्या यादीतही आता तो टॉपला पोहचलाय.
इंग्लंडमध्ये सलग पाच वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या डॉन ब्रॅडमन, हेन्सी क्रोन्जे, चंद्रपॉल, संगकारा अन् डेरियल मिचेल यांच्या क्लबमध्येही एन्ट्री
कसोटीतील दोन्ही डावात शतक झळकवणारा तो सातवा भारतीय फलंदाज ठरलाय. गावसकरांनी तीन वेळा तर द्रविडनं दोन वेळा हा डाव साधलाय.