कुणाच्या खात्यात किती विकेट्स? जाणून घ्या रेकॉर्ड्स
आर. अश्विन हा भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज राहिला आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक ११४ विकेट्स घेतल्या आहेत.
भागवत चंद्रशेखर या दिग्गज गोलंदाजाच्या खात्यात इंग्लंड विरुद्ध ९५ विकेट्स घेतल्याची नोंद आहे.
'जम्बो' अनिल कुंबळे यांनी आपल्या कारकिर्दीत इंग्लंड विरुद्ध कसोटीत ९२ विकेट्स घेतल्या आहेत.
बिशन सिंग बेदी यांच्या नावे इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत ८५ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.
भारतीय संघाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकून देणाऱ्या कपिल देव यांनी इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत ८५ विकेट्स घेतल्या आहेत.
वर्ल्ड रेकॉर्डसह कसोटी ऑलराउंडरच्या यादीत नंबर वन असलेल्या जड्डूनं इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यात ७० विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
इशांत शर्माच्या खात्यात इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत ६७ विकेट्स आहेत.
जसप्रीत बुमराहने आतापर्यंत इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत ६० विकेट्स घेतल्या आहेत.