इंटरनेट स्लाे झालं, काॅल पटकन लागला नाही की किती चिडचिड हाेते? आपला पेशन्स कमी पडताेय का? पेशन्स खूप महत्त्वाचा आहे.
कोणालाही थांबायला वेळ नाही. सगळंच फास्ट फाॅरवर्ड सुरू आहे. सेकंदासेकंदाला काहीतरी घडायला हवं, असं वाटतं.
या सगळ्या धावपळीत कुठेतरी पेशन्स हरवतं चालला आहे का? १५ सेकंदाची जाहिरात आपण पाहात नाही, स्किप ऑप्शन निवडताे.
प्रत्येकवेळी ही घाई चालत नाही, कुठेतरी थांबाव लागतं, पेशन्स ठेवावा लागताे, हे आता आपण विसरत चाललाे आहे.
पेशन्स वाढवायचा असेल तर निमय पाळा. वाहतुकीचे नियम पाळल्यास थांबायची सवय लागले.
कामाचे नियाेजन आधीच करून ठेवा. यामुळे गाेंधळ उडणार नाही, वेळेत काम झाल्याने पेशन्स वाढेल.
आयुष्यात प्रत्येकवेळी बदल अपेक्षित आहेत. आनंदाने बदल स्वीकारून स्वतःमध्ये बदल करा
ध्यान, प्राणायाम करा. स्वतःसाठी वेळ काढा. छाेट्या गाेष्टी एन्जाॅय करा, नक्कीच तुमचा पेशन्स वाढेल.