ऐन तारुण्यात 'या' कारणांमुळे येतो थकवा

काहीही झालं तरी सकाळी लवकर जाग येत नाही. सकाळी फ्रेश वाटतं नाही? ही आहेत कारण... 

सकाळी घरात सगळ्यांची घाई असते, पण झोपच पूर्ण होत नाही, मग सकाळी जाग येतच नाही. 

बदलती जीवनशैली आणि जागरण यामुळे हा प्रोब्लेम कॉमन झालाय. पण यावर सोप्पा उपाय आहे. 

रात्री अनेकजण मोबाईल हातात घेतात, मग स्क्रोलिंग सुरू झालं, की लवकर झोपायचा प्लॅन फसतो. 

कामाचे प्लॅनिंग करताना रिअल टाइम लक्षात न घेतल्याने रात्री उशिरापर्यंत कामच संपत नाहीत.

रात्री किमान ७  तासांची झोप झाली नाही की पुढे सगळ्या दिवसभराचे गणित चुकते. 

रात्री झोपताना मोबाइल लांब ठेवा. अलार्म झाल्यावर उठून बंद करावा लागेल इतक्या लांब ठेवा. 

रात्री हलका आहार घ्या. त्यामुळे अन्न पचन लवकर होऊन शांत झोप लागण्यास मदत होईल. 

काहीजण दुपारी, संध्याकाळी थोडा वेळ झोपतात. तुम्ही अस करत असाल तरी रात्री लवकर झोप लागत नाही. 

रात्री टेन्शन वाढवणाऱ्या विषयांवर चर्चा करणे टाळा. दिवस भरातल्या चांगल्या गोष्टी आठवा. 

Click Here