वाळवंटी भागात वाळूतून संगीत निर्मिती हाेते असे सांगितले, तर विश्वास बसणार नाही. पण, हे खरं आहे.
जगात या ठिकाणी वाळूतून संगीतासारखा आवाज येताे. याला Singing Sand असं म्हणतात.
साध्या वाळूतून हा आवाज येत नाही. हा आवाज येण्यासाठी वाळूचे कण एकसारखे, गुळगुळीत आणि कोरडे असायला लागतात.
चीनमधील Dunhuang Desert मध्ये वाळू वरून घसरल्यावर ती “ढोलासारखा” आवाज करते.
Singing Sand Beach कतारमधील समुद्रकिनाऱ्यावर चालताना वाळू सतत गाण्यासारखा आवाज करते.
मंगोलियाच्या Khongoryn Els वाळवंटात वाळूच्या टेकड्या आहेत. वारा सुटला की, इथली वाळू एकदम वाद्यांसारखा आवाज करते.
अमेरिकेतील Death Valley मध्येही अशा गाणाऱ्या वाळूच्या टेकड्या आहेत. इथे लोक त्याला “booming dunes” म्हणतात.
काही ठिकाणी Singing Sands चा आवाज इतका प्रचंड असतो की, हा आवाज १ किमी दूरवर ऐकू जाताे.
शास्त्रज्ञांच्या मते, वाळूच्या कणांचा आकार, ओलावा आणि एकसमान हालचाल हे या नैसर्गिक संगीताचं रहस्य आहे.