पावसाळी ट्रिपसाठी 'ही' ठिकाणं टाळा !

अनेकांना पावसाळ्यात फिरायला जायला आवडते. स्पेशल पावसाळी पिकनिक प्लॅन करणार असाल, तर 'या' ठिकाणी जाणे टाळा. 

पावसाळ्यात फिरण्याचा अनुभव खूप वेगळा असताे. त्यामुळे अनेकांचे प्लॅन असतात. पण, काही ठिकाणी रिस्कही जास्त असते. 

या ठिकाणी पावसात निसर्गाच साैंदर्य खुलत, पण या ठिकाणी जाणं रिस्की आहे. त्यामुळे इथे जाण्याआधी विचार करा. 

मसुरी 'क्वीन्स ऑफ हिल्स' येथे पावसाळ्यात निसर्ग सुंदर दिसताे. नद्या वाहात्या असतात, पण, इथे डाेंगराळ भागात डाेंगर खचल्याने रस्ते बंद हाेतात. 

ऋषिकेश रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. पण, गंगा नदी पावसाळ्यात खूप जाेरात वाहाते. यावेळी इथे राफ्टिंग करणे रिस्की आहे. 

शिमलाचे साैंदर्य पावसाळ्यात अजून खुलून येते. पावसाळ्यात रस्ते खचतात. वळणदार रस्ते असल्याने पावसाळ्यात इथे ड्राइव्ह करणे अवघड आहे. 

उत्तराखंड ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. पण, इथे भूस्खलन हाेत असल्याने अचानक रस्ते बंद करतात. त्यामुळे तुमचा प्लॅन कॅन्सल हाेऊ शकताे. 

पावसाळ्यात डाेंगराळ प्रदेशात जाण्याचा प्लॅन करू नका. पाऊस जास्त असलेल्या ठिकाणी गेल्यास तिथेच अडकू शकता. 

Click Here