जगात कुठल्या देशांमध्ये वाघ आढळतात, सर्वाधिक वाघ कुठे आहेत? वाघ असणाऱ्या देशांत भारताचा कितवा क्रमांक आहे? तुम्हाला माहिती आहे का?
दिवसेंदिवस जगातल्या वाघांची संख्या कमी हाेते आहे. वाघांच्या संवर्धनासाठी काही ठिकाणी विशेष कार्यक्रम राबविले जात आहेत.
पण, जगात वाघांची संख्या जास्त असणाऱ्या देश तुम्हाला माहिती आहे का ?
जगात सर्वाधिक वाघ असणाऱ्या देशांमध्ये भारताचा अव्वल नंबर आहे. तर, कंबाेडियामध्ये आता एकही वाघ नाही.
जगभरातल्या वाघांची संख्या आजच्या घडीला ४,९८९ इतकीच आहे. यापैकी २,९६७ वाघ हे भारतात आहेत.
जगातील एकूण वाघांपैकी जवळपास ५० टक्क्याहून अधिक वाघ हे भारतात आहेत.
रशियामध्ये ५४० आणि इंडाेनेशिया मध्ये ५०० वाघ आहेत. तर नेपाळमध्ये ३५५, थायलंडमध्ये १८९ वाघ आहेत.
मलेशियामध्ये १५०, बांग्लादेशमध्ये १०६, भूतानमध्ये १०३, चीन ५०, म्यानमार २२, व्हिएतनाम ५ लाओसमध्ये फक्त २ वाघ आहेत.