5 महत्त्वाच्या टीप्स ज्यामुळे करता येईल कामावर फोकस
कामावर फोकस कसा करायचा याच्या काही टीप्स
अनेकदा ऑफिसमध्ये कामाचं प्रेशर असेल किंवा आजुबाजूचं वातावरण सकारात्मक नसेल तर त्याचा परिणाम आपल्या कामावर होतो.
कामात लक्ष लागत नसेल तर सहाजिकचं त्याचा परिणाम आपल्या कामाच्या क्वालिटीवर होतो. म्हणूनच, कामावर फोकस कसा करायचा याच्या काही टिप्स पाहुयात.
कामात मन तेव्हाच लागतं ज्यावेळी मानसिक स्थिती स्थिर असते. म्हणूनच, मन प्रसन्न ठेवण्यासाठी कायम तुमचा डेस्क, आजुबाजूचा भाग स्वच्छ ठेवा. ज्यामुळे मनावरील आळस दूर होईल
जर एखादा प्रोजेक्ट मोठा असेल तर त्याचं काम काही भागांमध्ये वाटा. आणि टप्याटप्प्याने ते पूर्ण करा. यामुळे तुमच्यावर कामाचं प्रेशर येणार नाही.
दिवसभर तुम्ही कोणती काम करणार आहात. याचं वेळापत्रक तयार करा. ज्यामुळे योग्यवेळी ठरवलेली काम पूर्ण होतील. तसंच हे काम करतांना मध्येमध्ये ५-१० मिनिटांचा ब्रेक नक्की घ्या.
बराच काळ एकाच ठिकाणी बसून काम केल्यामुळे कालांतराने गोष्टी सुचेनाशा होतात. म्हणूनच, १-२ तासांनी लहान लहान ब्रेक नक्की घ्या.
काम करतांना सोशल मीडियापासून दूर रहा. नाही तर सतत येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे तुमचं लक्ष विचलित होऊ शकतं.