या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
लघवीचे प्रमाण वाढणे हे सुरुवातीचे लक्षण असू शकते. लघवी करताना तीव्र जळजळ किंवा दुखणे जाणवते.
लघवीचा रंग आणि वास धुरकट, गढूळ किंवा दुर्गंधीयुक्त लघवी किडनी इन्फेक्शनचे संकेत देते.
कंबर आणि पाठीच्या खालच्या भागात दुखणे, विशेषतः एका बाजूला किंवा दोन्ही बाजूंना सतत दुखणे जाणवते.
शरीरात ताप येणे, अंगावर शहारे येणे किंवा थंडी वाजणे हे इन्फेक्शन गंभीर असल्याचे सूचक आहे.
किडनी इन्फेक्शन वाढल्यावर पचनावरही परिणाम होतो आणि उलटीचा त्रास होतो.
लघवीत रक्त किंवा पस दिसणे हे गंभीर इन्फेक्शनचे चिन्ह आहे; त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
ही लक्षणे दिसल्यास उशीर न करता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर उपचार घेतल्यास किडनीचे नुकसान टाळता येते.