खासगी नोकरदारांनाही पेन्शनचा लाभ देणाऱ्या महत्त्वाच्या योजना

खासगी नोकरी करणाऱ्यांनी निवृत्तीनंतर चिंता करण्याची गरज नाही. 

खासगी नोकरी करणाऱ्यांनी निवृत्तीनंतर चिंता करण्याची गरज नाही. कारण सरकारनं खासगी कर्मचाऱ्यांसाठीही प्रभावी पेन्शन योजना उपलब्ध केल्या आहेत. 

या योजना खासगी नोकरदारांना केवळ निवृत्तीनंतर आर्थिक आधार देत नाहीत, तर कर बचतीसाठीही फायदेशीर ठरतात. चला तर मग, अशा ५ महत्त्वाच्या सरकारी पेन्शन योजनांची माहिती घेऊया.

आजपासूनच यापैकी कोणत्याही एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक सुरू करून तुम्ही तुमचं निवृत्तीनंतरचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि तणावमुक्त जगू शकता.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ): यामध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातून १२% रक्कम व नोकरी देणारी संस्थाही तितकीच रक्कम दरमहा भरते.

अटल पेन्शन योजना (एपीवाय) : दरमहा केवळ ४२ ते २१० रुपये गुंतवून ६० वर्षांनंतर १००० ते ५००० रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळू शकतं.

नॅशनल पेन्शन सिस्टिम (एनपीएस) : निवृत्तीनंतर ६०% रक्कम टॅक्स फ्री स्वरुपात काढता येते. तर उर्वरित ४०% रकमेतून मासिक पेन्शन मिळतं.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना : यात नोंदणी केलेल्यांना ६० वर्षांनंतर ३००० रुपये मासिक पेन्शन दिली जाते.

अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना : नोकरी गमावल्यानंतर तीन महिने मागील वेतनाच्या ५०% रक्कम मिळते.

FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

Click Here