'ही' राेपटी पाहूनच डास पळून जातील 

डासांचा खूप त्रास हाेताे. खिडकीला जाळ्या लावल्या, अन्य उपाय काम करत नाही. मग, ही राेपटी लावून तर बघा.

पावसाळ्यात आणि त्यानंतरही डासांमुळे त्रास हाेताे, आजारी पडण्याचा धाेका वाढताे. हे टाळण्यासाठी हे साेपे उपाय करा आणि डासांना पळवून लावा.

तुळस. तुळस लावली तर त्याच्या वासाने डास जवळ येत नाहीत. तुळशीचं राेपटं औषधी आहे. धार्मिक महत्त्वही आहे. त्यामुळे नक्की तुळशीच राेपटं लावा. 

कडुलिंबाचे फायदे सर्वांनाच माहिती आहेत. कडुलिंबाचे तेल हे डासांवर खूप गुणकारी आहे. यामुळे डास तुमच्या आजूबाजूला येणार नाहीत. 

सिट्राेनेला हे राेपटे तुमच्या घरी नक्की लावा. याच्या विशिष्ट प्रकारच्या वासाने डास यापासून लांब जातात. त्यामुळे घरात डास येणार नाहीत. 

राेजमेरीमुळे फक्त खाण्याचा स्वाद वाढत नाही. तर यामुळे डासही पळून जातील. हे राेपटे लावले तर हा फायदा नक्की हाेईल. 

लवेंडरचे राेपटे तुमच्या घरची शाेभा वाढवते. पण, याच्या विशिष्ट सुगंधामुळे डास या पासून लांब राहतात. डासांपासून तुमचा बचाव हाेईल.

पुदिन्याचे राेपटे नक्की लावा. याचा वापर तुम्ही जेवणातही करू शकता. तसेच, याच्या उग्र वासामुळे डास या राेपट्याजवळ येत नाहीत. 

झेंडुची फुलं खूप छान दिसतात. हे राेपट तुमच्या घराची शाेभा वाढवणार नाही, तर डासांनाही दूर ठेवते. झेंडूच्या वासामुळे डास दूर पळतात. 

Click Here