जिना चढण्याच्या कष्टापेक्षा लिफ्ट बरी वाटते. पण, मध्येच लिफ्ट बंद पडली की बंदिस्त लिफ्टमध्ये घाम फुटताे. अशावेळी पॅनिक झाल्यास अपघाताचा धाेका वाढताे.
लाईट गेले, टेक्निकल प्राॅब्लेम झाल्यामुळे लिफ्ट थांबते. लिफ्ट परत सुरू करण्यासाठी यंत्रणा असते. चुकीच्या गाेष्टी करून अपघाताचा धाेका वाढवू नये.
लिफ्टमध्ये तुमच्या बराेबर अजून व्यक्ती असतील तर त्यांनाही धीर द्या. शांत राहायला सांगा. गाेंधळ टाळा. खूपजण असल्यास समस्या वाढू शकते.
मधेच लिफ्ट बंद पडल्यावर शांत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्याची चूक करू नका.
लिफ्टमध्ये आपत्कालीन बटण असते, ते दाबा. बहुतेक लिफ्टमध्ये इंटरकॉम किंवा फोन देखील असतो, त्या फाेनचा वापर करून मदत मागा.
लिफ्टमध्ये अनेकदा माेबाईलला नेटवर्क नसते, त्यामुळे पॅनिक हाेऊ नका. स्वतःला शांत ठेवा. लिफ्टमधून मदतीसाठी हाक मारून बघा.
बराच वेळ प्रयत्न करूनही लिफ्टमधून बाहेर येण्याचा मार्ग मिळत नसेल, तर शेवटी फायर ब्रिगेडशी संपर्क करा.
दाेन मजल्याच्या मधे लिफ्ट थांबली असेल तर स्वतःहून एकट्याने बाहेर येण्याचा प्रयत्न करू नका, हे खूप धाेकादायक आहे.