थायरॉइड असेल तर खाऊ नका 'हे' पदार्थ

थायरॉइड असलेल्या व्यक्तींना खाण्यापिण्यासंबंधीचं पथ्यपाणी सांभाळावं लागतं.

सध्याच्या काळात अनेकजण थायरॉइडच्या समस्येने त्रस्त आहेत. ज्यांना थायरॉइड आहे अशा व्यक्तींना खाण्यापिण्यासंबंधीचं पथ्यपाणी सांभाळावं लागतं.

जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर काही विशिष्ट पदार्थांचं सेवन करणं तुम्ही टाळलं पाहिजे. हे पदार्थ कोणते ते पाहुयात.

ज्या व्यक्तींना थायरॉइडची समस्या आहे त्यांनी सोयाबीन किंवा सोयाबीनपासून तयार केलेल्या पदार्थांचं सेवन टाळावं. सोयामध्ये गॉइट्रोजन नावाचं तत्व असं ज्यामुळे थायरॉइडच्या ग्रंथींना मोठी हानी होते.

थायरॉइडग्रस्त व्यक्तींनी प्रोसेस्ड फूड खाणं टाळावं. नूडल्स, सॉस, केचप, जाम, मॅजिक मसाला या पदार्थांच्या सेवनामुळे थायरॉइड असलेल्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो.

थायरॉईडमध्ये कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली या भाज्यांना ब्रासिका व्हेजीज म्हणतात. या भाज्यांमध्ये थायरॉईड विरोधी संयुगे भरपूर प्रमाणात असतात. जे थायरॉईडच्या सामान्य कार्यामध्ये व्यत्यय आणू शकतात.

जेवणानंतर लगेच चहा प्यावा का?

Click Here