शनिवारी शनि पुष्य योगात शनिचे ५ उपाय करणे लाभदायक ठरू शकते.
२८ जून २०२५ रोजी शनिवारी सकाळी शनि पुष्य योग आहे. या दिवशी साडेसाती सुरू असलेल्यांनी काही उपाय करणे उपयुक्त मानले गेले आहे.
आताच्या घडीला कुंभ, मीन, मेष या राशींची साडेसाती सुरू आहे. तर सिंह आणि धनु राशींवर शनि ढिय्या प्रभाव सुरू आहे.
शनिवारी सकाळी तसेच प्रदोष काळी, तिन्ही सांजेला दिवे लागणीला शनी देवाचे स्मरण, पूजन करावे.
शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे. तेलाचा दिवा लावावा. हनुमंताचे दर्शन घ्यावे.
शनि बीज मंत्राचा जप यथाशक्ती करावा. विशेषत: शनिवारी अवश्य करावा.
शनीची उपासना, शनी स्तोत्राचे २१ वेळा पठण, शनी चालीसा पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात.
पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे.
सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.