रात्री झोपच लागत नाही? आहारात समाविष्ट करा हे सुपरफूड
रात्री नीट झोप लागावी यासाठी ट्राय करा सुपरफूड
बऱ्याचदा वयस्क व्यक्ती तक्रार करतात की रात्री त्यांना व्यवस्थित झोप लागत नाही.
यामागे अनेक कारण आहेत. मात्र, यावर उपायदेखील आहेत. म्हणून, रात्री नीट झोप लागावी यासाठी काही सुपरफूड्स कोणते ते पाहुयात.
डॉक्टरांच्या मते, झोप येत नसेल तर केळी आणि चेरी या फळांचं सेवन करावं. केळीमध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम असतं ज्यामुळे मेंदूच्या मांसपेशींना आराम मिळतो.
चेरीम मेलाटोनिनचा नैसर्गिक स्त्रोत आहे. ज्यामुळे मेंदू शांत राहतो आणि लगेच झोप लागते.
ओट्समध्ये कार्बोहायड्रेट आणि मेलाटोनिन असल्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण हळूहळू वाढतं व झोप येते.
किवी खाल्ल्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.
बदामामध्ये मॅग्नेशिअम असतं जे झोपेसाठी फायद्याचं आहे.
वारंवार किडनी स्टोनचा त्रास छळतो, टाळा हे ७ पदार्थ