महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणं भुलवतील तुमचं मन!

महाराष्ट्र फिरताय, तर 'ही' ठिकाणं अजिबात चुकवू नका.

महाराष्ट्र, भारतातील एक वैविध्यपूर्ण राज्य आहे, जिथे प्राचीन किल्ले, समुद्रकिनारे आणि आधुनिक शहरे एकत्र येतात.

अजिंठा आणि वेरूळ लेणी - ही जागतिक वारसा स्थळे त्यांच्या अद्भुत कला आणि कारागिरीसाठी प्रसिद्ध आहेत.

मुंबई - बॉलिवूड, फॅशन आणि फायनान्सची राजधानी, मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया आणि मरीन ड्राइव्हला भेट द्या.

लोणावळा - मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान असलेले हिल स्टेशन. भुशी धरण आणि टायगर्स लीप ही येथील प्रमुख ठिकाणे आहेत.

महाबळेश्वर - स्ट्रॉबेरी लागवड आणि वेण्णा तलावासाठी प्रसिद्ध, हे एक शांत पर्यटन स्थळ आहे.

अलिबाग - समुद्रकिनारे आणि किल्ल्यांचे शहर. अलिबाग समुद्रकिनारा आणि कुलाबा किल्ला हे आकर्षणाचे केंद्र आहेत.

नाशिक - धार्मिक पर्यटन आणि वाईनसाठी प्रसिद्ध. इथे सुला वाईन यार्ड्स आणि त्र्यंबकेश्वर मंदिर चुकवू नका.

महाराष्ट्र फिरते तर वडा पाव, मिसळ पाव आणि पुरण पोळी यांसारख्या स्थानिक पदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

Click Here