भारतात 'या' १० ठिकाणी नक्की फिरायला जा!

ट्रिप प्लॅन करत आहात? मग, देशातल्या या ठिकाणांचे साैंदर्य नक्की एकदा तरी अनुभवायला हवे. भारतातील हे सुंदर जागा तुम्हाला माहिती आहेत का? 

डवकी हे मेघालय राज्यातील एक ठिकाण आहे. उमंगाेट नदीच्या काठी वसलेले आहे. काचेसारखी नदी अशी याची ओळख असून स्वच्छतेसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. 

अल्लपुळा किंवा अल्लेपी केरळमधील शहर असून बॅकवाॅटरसाठी प्रसिद्ध आहे. अल्लपुळाला 'भारताचे व्हेनिस' म्हणतात. इथे नद्या, कालवे, समुद्र किनारे आहेत. 

माउंट आबू हे राजस्थान राज्यातील सिहाेरी जिल्ह्यात येते. हे थंड हवेचे ठिकाण असून अरवली पर्वत रांगांमध्ये वसलेले आहे. 

कूर्गला काेडगू म्हणून ओळखले जाते. कर्नाटक राज्यातील डाेंगराळ भागात कूर्ग वसलेले आहे. निसर्गरम्य ठिकाणं आणि काॅफीच्या बागांसाठी हे प्रसिद्ध आहे. 

मुन्नार हे केरळ राज्यातील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. तीन नदींच्या संगमावर वसलेले असल्यामुळे त्याला मुन्नार असं नाव पडले. इथे चहाचे मळे आहेत. 

पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश आहे. बंगालच्या उपसारगाच्या किनारी वसले आहे. याला भारताचे फ्रेंच शहर म्हणूनही ओळखले जाते. 

मेघालय हे भारताच्या इशान्य भागात स्थित आहे. सर्वाधिक पाऊस हाेणारे ठिकाण म्हणून मेघालयची ओळख आहे. 

जैसलमेरची ओळख ही 'सुवर्ण नगरी' अशी आहे. जैसरलमेर हे राजस्थानात असून इथल्या किल्ल्यामध्ये आजही लाेक वास्तव्य करतात. उंट सफारीसाठी हे प्रसिद्ध आहे. 

उदयपूर हे राजस्थानातील प्रसिद्ध शहर आहे. उदयपूरची ओळख 'तलावांचे शहर' अशी आहे. या शहराला ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभला आहे. 

उटी हे शहर तामिळनाडू राज्यात आहे. उधगमंडलम असेही या शहराला म्हटले जाते. थंड आणि शांत वातावरणासाठी हे शहर प्रसिद्ध आहे.

Click Here