दीप्ती शर्मा वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारी दुसरी; टॉपर कोण? इथं पाहा रेकॉर्ड

एक नजर महिला वनडेतील खास कामगिरीवर...

वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावल्यावर गोलंदाजी वेळी तिने टीम इंडियाकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. 

या कामगिरीसह दीप्ती आता महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी भारताची दुसरी गोलंदाज ठरलीये. 

दीप्ती शर्मानं आतापर्यंत खेळलेल्या वनडेतील ११२ डावात १४३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. 

भारताची माजी जलदगती गोलंदाज झुलन गोस्वामी या यादीत सर्वात टॉपला आहे. 

आपल्या कारकिर्दीत २०४ सामन्यातील २०३ डावात २५५ विकेट्स घेतल्या आहेत. महिला वनडेत २०० विकेट्स घेणारी ती एकमेव गोलंदाज आहे.

भारताकडून नीतू डेव्हिड या दिग्गज गोलंदाजाच्या नावे ९७ डावात १४१ विकेट्सची नोंद आहे. 

भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या आघाडीच्या ५ गोलंदाजांच्या यादीत नूशीर अल खदीर ७७ डावातील १०० विकेट्स सह चौथ्या स्थानी आहे.

राजेश्वरी गायकवाडच्या नावे ६४ डावात ९९ विकेट्सची नोंद आहे.