टीम इंडियातील या दोघींचा जलवा
आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या १३ व्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटर्सच्या यादीत दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा लॉरा वॉल्व्हार्ड टॉपला आहे.
लॉरानं ८ सामन्यातील ८ डावात एक शतक आणि ३ अर्धशकासह ४७० धावा केल्या आहेत. फायनलमध्ये तिला ५०० धावांचा टप्पा पार करण्याची संधी आहे.
भारताची उप कर्णधार स्मृती मानधना हिने एक शतक आणि २ अर्धशतकाच्या मदतीने ८ सामन्यातील ८ डावात ३८९ धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियन ॲशली गार्डनर हिने ७ सामन्यातील ५ डावात २ शतकाच्या मदतीने ३२८ धावा केल्या आहेत.
दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झालेल्या भारताच्या प्रतिका रावल हिने ७ सान्यातील ६ डावात एक शतक आणि एका अर्धशतकासह ३०८ धावा केल्या आहेत.
फीबी लिचफिल्ड हिने ७ सामन्यातील ७ डावात एक शतक आणि एका अर्धशतकासह ३०४ धावा काढल्याचे पाहायला मिळाले.
ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हीली हिने ५ सामन्यातील ५ डावात २ शतकाच्या मदतीने २९९ धावा काढल्या