रक्तातील साखर वाढली तर शरीर देतं हे संकेत!

मधुमेह टाळायचा? तर वेळीच सतर्क व्हा

आपल्याला कोणताही आजार झाला की आपलं शरीर त्याविषयी आपल्याला संकेत द्यायला लागतं. परंतु, अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.

शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर हिच किरकोळ दुखणी पुढे मोठ्या आजारांचं स्वरुप घेतात. त्यामुळे आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे.

जर तुम्हाला रात्री वारंवार जाग येत असेल आणि नंतर अजिबातच शांत झोप लागत नसेल तर याचं कारण म्हणजे रक्तातील साखर वाढून तुमची नर्व्हस सिस्टिम जास्त स्टिम्युलेट होत आहे. 

जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल आणि बाथरुमलाही जाण्याची इच्छा होत असेल तर तुमच्या शरीरातील साखरेचं प्रमाण वाढलं आहे.

वारंवार गोड खाण्याची इच्छा होणे हे देखील रक्तातील साखर वाढण्याचं एक लक्षण आहे. 

शरीरावर वारंवार खाज येणे. हा आपल्याला त्वचेचा त्रास वाटू शकतो. पण रक्तातील साखर वाढल्याने अनेक सुक्ष्म रक्तवाहिन्या खराब होतात आणि त्यामुळे शरीरावर सतत खाज येते.

डोकेदुखीची कारणे कोणती?

Click Here