सर्दी झाल्यावर जेवणाची इच्छा का मरते?

नाकाचे मुख्य काम श्वासाेच्छावास असले तरी नाकामुळेच विविध सुंगध आपल्याला कळतात. 

मानवी नाक हे ५० हजाराहून अधिक वेगवेगळे सुगंध ओळखू शकत, वैज्ञानिकांच्या संशाेधनातून हे समाेर आले आहे. 

आपल्या नाकात Olfactory Receptors नावाचे रिसेप्टर्स असतात. हे रिसेप्टसर्स वेगवेगळ्या गंधकणांना पकडतात आणि आपल्याला वास येताे. 

वासामुळे आपल्या स्मृती तयार हाेतात. या स्मृती खूप काळ टिकून राहतात.एखादा गंध तुम्हाला थेट बालपणात किंवा खास प्रसंगात घेऊन जातो.

जेव्हा आपण एखाद्या पदार्थाची चव घेताे. तेव्हा चवीपेक्षा त्याचा गंध ८० टक्के प्रमाणात आपल्या अनुभवाला प्रभावित करताे. 

सर्दीमुळे नाक चाेंदत, बंद हाेत, त्यावेळी म्हणूनच आपल्याला खाणं बेचव वाटतं. खाण्याची इच्छा हाेत नाही. जेवणाची इच्छा राहात नाही. 

नाकातील वास ओळखण्याची क्षमता कमी झाली, तर ते तुम्ही आजारी असल्याचे लक्ष असू शकते. (उदा. कोरोना, Alzheimer’s).

कुत्र्याचं नाक मानवी नाकापेक्षा हजारो पटीने शक्तिशाली असतं. पण माणसाचं नाकही निसर्गातील खूप सूक्ष्म वास टिपतं.

संशोधनात असे आढळून आले आहे की, माणूस फक्त नाकाच्या मदतीने गाेड वास आणि दुर्गंधी एकाच वेळी ओळखू शकताे. 

परफ्यूम, अन्नपदार्थ, फुलं या सर्व गाेष्टी आपल्याला खास अनुभव देतात. सुगंधाचा आपल्या मूडवर थेट परिणाम हाेताे. 

Click Here