दर मिनीटाला शरीरात हाेत असतात 'हे' बदल

दर मिनिटाला आपल्या शरीरात किती बदल हाेत असतात ? एकावेळी किती क्रिया घडत असतात? तुम्हाला कल्पना आहे का?

शरीरात दर मिनिटाला साधारणतः ३० लाख पेशी नष्ट हाेतात आणि नव्याने तयार हाेतात. आपल्याला कळतही नाही, शरीर स्वतःची दुरूस्ती करत असते. 

आपल हृदय विश्रांती न घेता अविरतपणे दरराेज १ लाख वेळा धडधडतं. सुमारे ७,५०० लिटर रक्त पंप करत असतं. 

शरीरातील आतडी हा आपला दुसरा मेंदू आहे. तणाव जाणवला तर पाेटात गाेळा येताे. कारण, काही वेळा पचनसंस्था मेंदूपेक्षा लवकर प्रतिक्रिया देते. 

त्वचा हा आपल्या शरीरातील सर्वात माेठा अवयव आहे. त्वचेमुळे उष्णता, थंडी, स्पर्श आणि धाेका यांचा इशारा देते.

आपल्या डाेळ्यांना १० लाखांहून अधिक रंगछटा वेगवेगळ्या प्रकारे ओळखतात. पण, आपण फार थाेड्या प्रमाणात त्यांचा वापर करताे. 

अन्न गिळताे ही साधी क्रिया वाटते, पण ती खूप जटिल आहे. अन्न गिळण्यासाठी ५० पेक्षा जास्त स्नायूंचा एकत्रित वापर केला जाताे. 

सर्दी हाेते म्हणजे शरीर स्वतः डिटाॅक्स करतं असतं. शरीराची सफाई प्रक्रिया म्हणून आपल्याला सर्दी हाेते, ताप येताे. हे राेगप्रतिकारक शक्तीचे संकेत असतात. 

आपण जेव्हा हसताे, तेव्हा १०० पेक्षा जास्त स्नायूंचा वापर केला जाताे. हसल्याने मानसिक ताण  कमी हाेताेच, पण रक्ताभिसरण सुधारते. 

शरीरात राेजच्या राेज आपल्या नकळत पणे काेट्यावधी प्रक्रिया चालू असतात. म्हणून त्याची निगा राखणं ही आपली सर्वात माेठी जबाबदारी आहे. 

Click Here