गिटार वादक ट्रेरी कसा बनला WWE चा Hulk Hogan

नुकतेच WWE मधले प्रसिद्ध कुस्तीपटू हल्क होगन यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झालं.

 नुकतेच WWE मधले प्रसिद्ध कुस्तीपटू हल्क होगन यांचं निधन झालं. ज्यावेळी WWE चं नाव हे WWF होतं तेव्हाचे ते स्टार कुस्तीपटू होते. 

WWF घराघरात पोहचवण्यात हल्क होगन यांचा मोलाचा वाटा होता. WWF प्रसिद्ध करणाऱ्या स्टार कुस्टीपटूंमध्ये हल्क यांचं देखील नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. 

हल्क होगन यांचं खरं नाव हे ट्रेरी जीन बोलेओ होतं. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १९५३ रोजी जॉर्जिया इथं झाला. नंतर ते कुटुंबासह फ्लोरिडाला शिफ्ट झाले. 

होगन यांचं पहिलं पॅशन हे संगीत होतं. त्यांना बेस गिटार वाजवण्याचा छंद होता. त्यांनी तारूण्याच्या काळात आपला एक ब्रँड देखील सुरू केला होता. 

Ruckus नावाचा हा बँड फ्लोरिडाच्या छोट्या छोट्या क्लबमध्ये परफॉर्म करत होता. तिथं ट्रेरी उर्फ हल्क हे बेस गिटार वाजवायचे. 

एकेदिवशी कुस्तीपटू ब्रिस्को ब्रदर्स यांची नजर ट्रेरी यांच्यावर पडली. त्यावेळी त्यांनी त्याला तुझं शरीर हे रिसलिंगसाठी बनलं आहे असं सांगितलं. 

इथूनच गिटारिस्ट ट्रेरीचा हल्क होगन होण्याचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर ट्रेरी यांनी १९७९ मध्ये आपली पहिली व्यावसायिक कुस्ती लढली. 

एका टीव्ही शोमध्ये होस्टनं ट्रेरी यांना तुम्ही हल्कपेक्षाही मोठे दिसता असं म्हटलं होतं. इथूनच ट्रेरी यांचं नाव हल्क होगन असं झालं. 

Click Here