प्रदूषणामुळे वाढतोय पॅरालिसिसचा धोका? 

थंडीच्या दिवसात बऱ्याचदा प्रदूषणामुळे श्वसनासंबंधीच्या अनेक समस्या निर्माण होतात

गेल्या काही वर्षांमध्ये हवेतील प्रदूषणाचं प्रमाण झपाट्याने वाढलं आहे. यामध्ये थंडीच्या दिवसात वाढत्या प्रदुषणामुळे अनेक आजार डोकं वर काढत आहेत.

ज्या व्यक्तींना हाय ब्लडप्रेशर किंवा डाय कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांना पॅरालिसिसचा धोका अधिक असल्याचं म्हटलं जातं.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, प्रदूषणातील नायट्रोजन डायऑक्साइडसारखे कण फुफ्फुसांनाच नव्हे तर मेंदूलाही नुकसान पोहोचवतात. यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.

सायलेंट स्ट्रोकमुळे मेंदूच्या लहान नसांमध्ये अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे पॅरालिसिस होतो. 

वाढत्या प्रदूषणामुळे हा धोका आणखी वाढतो. अशा परिस्थितीत, प्रदूषण आणि थंडीच्या मिश्रणामुळे सायलेंट ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. त्याची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत.

सतत तीव्र डोकेदुखी, चालताना संतुलन बिघडू शकतं, अंधूक दिसणं, सकाळी उलट्या होणं अशी लक्षणं आढळतात. सायलेंट स्ट्रोक टाळण्यासाठी आधी प्रदूषण आणि थंडीपासून स्वतःचं संरक्षण करणं महत्त्वाचं आहे.

मास्क घाला आणि सकाळी आणि संध्याकाळी बाहेर जाणे टाळा. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर किंवा हाय कोलेस्ट्रॉल असेल तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवा. 

पित्त होण्याची करणे कोणती?

Click Here