वजन कमी करण्यासाठी डाएट प्लान कसा असेल?
आपल्यालापैकी अनेकांना बॉडी स्लिम आणि फिगर हवी असते. परंतु, वजन कमी करणे हे देखील सगळ्यात मोठे आव्हान आहे.
डॉक्टरांनी वजन कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत, ज्यामुळे दहा दिवसांत चार किलो वजन कमी होईल.
सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या. ज्यामुळे आपली पचनसंस्था सक्रिय होते.
सकाळी नाश्त्यामध्ये फळे खा. यामध्ये पपई, सफरचंद, संत्री, कलिंगड किंवा पेरु असायला हवे. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल.
दुपारच्या जेवणात आहार हलका असायला हवा. चपाती, कमी तेलात उकडवलेल्या भाज्या, डाळ आणि कोशिंबीर. तळलेले पदार्थ खाऊ नका.
संध्याकाळी आपण काहीतरी हलके पदार्थ खायला हवे. यामध्ये इडली, पोहे, उपमा. यामध्ये जास्त तेल किंवा बटर नको.
रात्री जेवू नका, दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजतेपर्यंत काहीही खाऊ नका. भूक लागल्यास पाणी प्या.
रात्री न जेवल्याने शरीराला १२ ते १५ तास विश्रांती मिळते. ज्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.
तसेच वजन कमी करताना दुग्धजन्य पदार्थ अजिबात खाऊ नयेत. यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. ज्याने आपले वजन वाढू शकते.
दहा दिवस आपण हा डाएट प्लान फॉलो केल्यास नक्कीच आपले वजन कमी होईल. जर अशक्तपणा जाणवत असेल डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.